करोनाच्या संसर्गाच्या मुद्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या ३४ सदस्यीय कार्यकारणी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत जागतिक आरोग्य संघटनेच्या आपात्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. मायकल रायन यांनी हा इशारा दिला. जगातील मोठी लोकसंख्येला करोना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. त्यांनी सांगितले की, करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होणार आहे. मात्र, संसर्ग कमी करण्यासाठी आणि लोकांचे प्राण वाचवण्यासाठी वैद्यकीय उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचवण्यास यश आले असून येणाऱ्या दिवसांत अनेकांचे प्राण वाचवता येऊ शकतात. दक्षिण-पूर्व आशिया भागात करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तर, युरोप आणि पूर्व भूमध्य सागराजवळील प्रदेशात बाधितांच्या मृत्यूंची संख्या वाढत आहे. आफ्रिका आणि पश्चिम पॅसिफिक भागातील स्थिती अधिक चांगली होती, असेही त्यांनी सांगितले.
वाचा:
वाचा:
सध्याची परिस्थिती पाहता, जगभरातील १० टक्के लोकसंख्या म्हणजे जवळपास ७६ कोटीजणांना करोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. करोनाबाधितांची संख्या जेवढी नोंदणीकृत झाली आहे, त्यापेक्षाही अधिकजणांना झाला असल्याचे अनेक तज्ञांनी सांगितले आहे.
वाचा:
जगभरात करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत ३ तीन कोटी ५२ लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी १० लाख बाधितांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक करोनाबाधितांची संख्या आहे. अमेरिकेत ७४ लाखांहून अधिकजणांना करोनाची बाधा झाली आहे. तर, भारतात ६६ लाखजणांना करोनाची बाधा झाली आहे. ब्राझील तिसऱ्या स्थानावर असून ४९ लाख जणांना करोनाची बाधा झाली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times