मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी एएनआयला ही माहिती दिली आहे. प्रकरणात मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय घेण्यात आला होता. पोलीस आयुक्तांवरही आरोप करण्यात आले होते. १४ जून रोजी वेगवेगळ्या सोशल माध्यमांमध्ये तब्बल ८० हजार बनावट खाती तयार करण्यात आली होती. त्याद्वारे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर व महाराष्ट्र सरकारविरोधात अपप्रचार केला जात होता. असभ्य भाषेचा वापर केला जात होता. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी या संदर्भात तपास करण्याचे आदेश सायबर सेलला दिले होते. त्यानुसार सध्या दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. इटली, जपान, इंडोनेशिया, तुर्की, पोलंड, थायलंड, रोमानिया, फ्रान्स अशा देशांतून या पोस्ट केल्या जात असल्याचं सायबर तपासात आढळून आल्याचं वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ या इंग्रजी दैनिकानं दिलं आहे. यातील बहुतेक पोस्ट विदेशी भाषांमध्ये होत्या. #justiceforsushant #sushantsinghrajput and #SSR असा हॅशटॅगमुळं पोलिसांना या अकाऊंटचा सुगावा लागला असून अशा इतर अकाऊंटचा शोध सुरू आहे, असं एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
पोलीस आयुक्तांच्या या निर्णयाचं काँग्रेसनं स्वागत केलं आहे. ‘आम्ही या सोशल मीडिया रॅकेटची चौकशी करण्याची मागणी केली होती. ही सगळी बनावट खाती भाजपच्या आयटी टीमनं तयार केली असून सुशांतसिंह प्रकरणात गोंधळ माजवून देण्याचा व महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा त्यामागे हेतू होता, असा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ‘लवकरच आम्ही सोशल मीडियातील या अकाऊंटशी संबंधित महत्त्वाची माहिती सरकारला देणार आहोत,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times