अरबाज शेख हा युवक बुधवारी दुपारी १च्या सुमारास नगर-मनमाड महामार्गालगत असलेल्या बोल्हेगाव-नागापूर रस्त्याने जात असताना पतंग उडवणाऱ्याचा नायलॉन मांजा त्याच्या गळ्याला अडकला, त्याने तो काढण्याचा प्रयत्न केला. पण हनुवटीखालील भागाला तो अडकून ओढला गेल्याने हा भाग कापला गेला. जखमेतून रक्त वाहू लागल्याने आजूबाजूच्या लोकांनी त्याला तेथे जवळच असलेल्या डॉ. बोरुडे यांच्या रुग्णालयात नेले. त्यांनीही तातडीने जखम साफ करून त्यावर टाके टाकले. पण हनुवटीला अडकल्यावर मांजा ओढला गेल्याने हनुवटीच्या वरच्या भागही कापला गेला आहे. हा सर्व भाग टाके घालून शिवण्यात डॉ. बोरुडे यांचे कौशल्य पणास लागले.
या युवकावर आता उपचार सुरू असून प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉ. बोरुडेंनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. या घटनेआधी काहीवेळ आधीच पाच वर्षाच्या लहान मुलाच्या कपाळावर मांजाने कापले गेले असल्याने त्याच्यावरही तीन टाके घालून उपचार केल्याचेही त्यांनी सांगितले. पतंग उडवताना वापरू नये तसेच रस्त्याने जा-ये करणारांनीही सावध व सावकाशपणे दुचाकी चालवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times