बेस्ट समितीच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्रवीण शिंदे, भाजपकडून प्रकाश गंगाधरे व काँग्रेसकडून यांनी अर्ज भरले होते. मात्र, निवडणुकीच्या दिवशी, आज रवी राजा यांनी अर्ज मागे घेतला. मतदानाच्या वेळी तटस्थ राहिली. त्यामुळं शिवसेनेचे प्रवीण शिंदे यांचा सहज विजय झाला. शिंदे यांना आठ मते मिळाली. भाजपचे प्रकाश गंगाधरे यांना ५ मते मिळाली. तर, दोन मते अवैध ठरली.
वाचा:
काल झालेल्या स्थायी समिती व शिक्षण समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीतूनही काँग्रेसनं ऐनवेळी माघार घेतली होती. त्याचीच पुनरावृत्ती आज झाली.
काँग्रेसच्या या माघारीच्या भूमिकेवर भाजपनं जोरदार टीका केली आहे. ‘ पुरस्कृत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी स्वतःची उमेदवारी मागे घेऊन शिवसेनेसमोर लोटांगण घातले,’ अशी टीका भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी केली आहे. ‘विरोधी पक्ष, सत्तेतील मलाईवर लक्ष’ असा टोलाही त्यांनी काँग्रेसला हाणला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times