म.टा. प्रतिनिधी, नगरः ‘महिला या देशाची ताकद असताना त्यांच्यावर होणार्‍या अत्याचाराच्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत. महिला सशक्त झाल्या तरच देशाचा विकास होईल. मात्र, भाजप शासित राज्यांत महिला असुरक्षित आहेत,’ अशी टीका शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली.
संगमनेर येथील जय हिंद महिला मंचच्या वतीने आयोजित ‘महिलांचे सशक्तीकरण व आरोग्य’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात खा. चतुर्वेदी सहभागी झाल्या होत्या.

त्या म्हणाल्या, ‘आपल्या देशात महिलांची लोकसंख्या सुमारे पन्नास टक्के आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीने त्या काम करीत आहेत. मात्र करोनाच्या संकटामुळे देशातील २३ टक्के महिला बेरोजगार झाल्या आहेत. देशाती ताकद असणाऱ्या महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना चिंताजनक आहेत. हाथरसमध्ये झालेली घटना या अत्यंत खेदजनक आहे. याविरोधात प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे. राजकारणामध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण असले तरी प्रत्यक्षात तेथे १४ टक्के महिलाच कार्यरत आहेत. त्यामुळे महिलांनी अधिकाधिक समाजकारणात सक्रीय व्हावे,’ असे आवाहनही त्यांनी केले.

चर्चासत्रात संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, पद्मश्री कल्पना सरोज. युवा ईबस (स्पेन) वेस्टइंडीज क्रिकेट संघाच्या फायनान्स ऑफिसर पूजा कराचीवाला. लुझुमी किताजाँ (जपान) प्रिया धुमाळ (अमेरीका) सामाजिक कार्यकर्त्या स्मिता सिंगलकर, अभिनेत्री प्रियंका वामन. पल्लवी खैरनार (अमेरीका) डॉ. क्लारिसा (ऑस्ट्रेलिया ) या महिलांनी सहभाग घेतला.

उत्तर प्रदेशातील हाथरसची घटना ताजी असल्याने या परिसंवादात बहुतांश वक्त्यांनी या संदर्भाने मते मांडली. त्यामुळे केवळ देशातील नव्हे तर जगातील महिलांवरील अत्याचाराची चर्चा झाली. यावेळी बोलताना ऑस्ट्रेलियाच्या डॉ. क्लारिस्सा म्हणाल्या, ‘आंतरराष्ट्रीय पातळीवरही महिलांचे मोठे योगदान आहे. मात्र महिला सुरक्षितता हा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील गंभीर प्रश्न बनवा आहे. अनेक देशांमध्ये आजही महिला पारंपारिक जोखडामध्ये आहेत. त्यातून त्यांना मुक्त करण्यासाठी साक्षर जग साक्षर देश होणे अत्यंत गरजेचे आहे.’

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here