पुणे: शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अँटी गुंडा स्कॉड पुन्हा स्थापन करावे. अशी मागणी खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर यांच्यावतीने एक निवेदन आज नवनियुक्त पोलीस आयुक्त यांना देण्यात आले.

महिलांसाठी सुरक्षा व्यवस्था वाढवणे या मुद्यावर भर देत, हेल्मेट सक्ती दाट वस्तीच्या ठिकाणी नसावी तसंच पोलीस दक्षता समीत्या लवकरात लवकर स्थापन कराव्यात. अशी मागणीही बापट यांनी केली आहे. शहरातील मुख्य चौकातील भिक्षेकऱ्यांचा प्रश्न सोडवून, नागरिकांना त्यांचा त्रास होणार नाही. यासाठी प्रयत्न करावेत. मंदिरात देव दर्शनासाठी जाणा-या भक्तांना योग्य त्या अटीसह परवानगी देण्याची शिफारस शासनास करावी. अशी सूचना बापट यांनी या चर्चे दरम्यान केली.

पोलीस दलातील उपायुक्त व इतर अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय राखण्याबाबत आदेश देण्यात यावेत. व वाहतूक सुरक्षतेसाठी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. या मुद्द्यांकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही बापट यांनी केली. त्याचबरोबर, जप्त केलेल्या वाहनांची तात्काळ विल्हेवाट लावावी. व अशा वाहनांसाठी जागेचे योग्य नियोजन करावे. या सर्व गोष्टी शहराच्या व पुणेकर नागरिकांच्या दृष्टीने तातडीने होणे आवश्यक आहेत. जेणेकरून सुसंस्कृत पुण्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना मुक्त वातावरण उपलब्ध होण्यास मदत होईल. अशी आशा बापट यांनी व्यक्त केली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here