मुंबईः मुंबईतील डोंगरी विभागातील कोळी महिलांनी अलीकडेच कृष्णकुंज येथील निवासस्थानी यांची भेट घेतली. परप्रांतीय मासेमारांच्या मुजोरीमुळं आमच्या व्यवसायाला मोठा फटका बसतो आहे, अशी तक्रार या महिलांनी राज ठाकरे यांच्याकडे केल्यानंतर २४ तासांत मनसेनं या परप्रांतीयांना दणका दिला आहे.

मुंबईतील डोंगरी मासळी बाजाराबाहेर परप्रांतीय मासेविक्रेत्यांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात केलेल्या अतिक्रमणाचा प्रश्न घेऊन या महिला राज ठाकरे यांना भेटल्या होत्या. राज ठाकरे स्वतः या महिलांच्या भेटीसाठी आले व त्यांची समस्या जाणून घेतली. त्या मासेविक्रेत्यांना हटवा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

राज ठाकरे यांनी कोळी भगिनींची तक्रार ऐकून घेतली व २४ तासांतच हा प्रश्न मार्गी लावला. मनसेच्या स्थानिक विभागाध्यक्ष संजय नाईक यांनी बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना दणका दिला आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात जिम चालक-मालक, थिअटर चालक-मालक, सलून व्यावसायिक, हॉटेल मालक-चालक, मुंबईतील डबेवाले अशा विविध क्षेत्रातील लोकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. करोनानंतरच्या लॉकडाऊनमुळं येणाऱ्या अडचणी त्यांनी राज यांच्यापुढं मांडल्या होत्या. तसंच, याबाबत आवाज उठवण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासन राज यांनी दिलं होतं.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here