वाचा:
‘करोना रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. मात्र, देशाचे नेते सांगतात, मुख्यमंत्री राज्याचे कॅप्टन आहेत. पण कॅप्टन काही घराबाहेर पडत नाही आणि कॅप्टनला बाहेर फिरू देखील दिले जात नाही. शरद पवार मात्र स्वत: या वयातही जिल्ह्याजिल्ह्यात फिरतात. या सर्वामागे असा हेतु दिसतोय की, शिवसेना संपवायची व राष्ट्रवादीची ताकद वाढवायची आणि तसाच प्रयत्न राष्ट्रवादीकडून केला जातोय,’ अशी घणाघाती टीका माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली होती.
वाचा:
या टीकेला शिवसेनेचे नगर तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, गोविंद मोकाटे व राष्ट्रवादीचे केशव बेरड यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘कर्डिले यांनी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी शिवसेनेची नाही. आमदारकी गेल्यापासून कर्डिलेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना कोणी विचारत नाही. आजवर दडपशाही करून ठेवलेले कार्यकर्ते आता दूर गेले आहेत. त्यामुळे आता त्यांना त्यांच्या अस्तित्वाची काळजी घेणे गरजेचे आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी मिळूनच कर्डिले यांना राहुरी मतदारसंघात चारी मुंडया चित केले. आजवर शिवसेना साथ देत होती, म्हणूनच तुम्ही आमदार होत होतात. यावेळी शिवसेनेने राहुरीमध्ये राष्ट्रवादीला उघड साथ दिली, तर तुमचा पराभव झाला, हे विसरू नका, असे शिवसेना व राष्ट्रवादीने कर्डिलेंना सुनावले.
वाचा:
तुम्ही तुमच्या अस्तित्वाची चिंता करा!
नगर तालुक्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस युतीनेच तुम्हाला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये धूळ चारली आहे. आता आमदारकी गेल्याने कोणी कर्डिलेंकडे जात नाही. ते स्वतःच आता कार्यकर्त्यांना बोलावून घेतात. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मोठी मोठी विधाने करतात. कर्डिले यांचा झाला आहे. प्रसिद्धीसाठीच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर ते बोलत आहे. त्यांनी आता त्यांच्या अस्तित्वाची चिंता करावी. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्ही आमचे पाहून घेऊ. तुम्ही तुमच्या अस्तित्वाची चिंता करा,’ असेही या पदाधिकाऱ्यांनी कर्डिलेंना बजावून सांगितले.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times