पुणे: खासगी प्रयोगशाळांमधील तंत्रज्ञ आणि सदृष्य लक्षणे असलेल्या रुग्णांचे स्त्राव घेणारे कर्मचारी हे मोठ्या प्रमाणात करोना बाधित झाल्याचे निदर्शनास आल्याने गेल्या पाच दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाण हे घटले आहे. या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन मनुष्यबळ पुरविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याने चाचण्यांचे प्रमाण लवकरच पूर्ववत होणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३ टक्के झाले असून हा खूप मोठा दिलासा ठरला आहे. ( )

वाचा:

देशात पुण्यामध्ये सर्वाधिक करोना चाचण्या घेण्यात येत आहेत. मात्र, हे काम करणारे कर्मचारी करोना बाधित होऊ लागल्याने अडचण निर्माण झाली आहे. याबाबत विभागीय आयुक्त म्हणाले, ‘जून महिन्यापासून देशात सर्वाधिक चाचण्या या पुण्यात करण्यात येत आहेत. मात्र, खासगी प्रयोगशाळांमधील तंत्रज्ञ आणि संशयित रुग्णांच्या घसा किंवा नाकातील स्त्राव घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. या कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी मनुष्यबळ पुरवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, येत्या तीन ते चार दिवसांत चाचण्यांचे प्रमाण पूर्ववत होणार आहे.’

वाचा:

‘जिल्ह्यात गेल्या सात दिवसांमध्ये दररोजच्या चाचण्यांच्या तुलनेत करोना बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण हे सरासरी २३ टक्के झाले आहे. त्यापूर्वी हे प्रमाण ३५ टक्के होते. पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण हे १५ ते १८ टक्के आहे. पुणे शहरात हे प्रमाण २१ ते २३ टक्के, तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हे प्रमाण २१ ते २५ टक्के आहे. पुणे, शहरे आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उपचारानंतर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे ८३ टक्के झाले आहे’, असे राव यांनी सांगितले.

वाचा:

दोन दिवसांत होणार सुरू
‘पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये करोनामुक्त झालेल्या नागरिकांचे समुपदेशन करण्यासाठी पाच ठिकाणी पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत या ओपीडी सुरू केल्या जाणार आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवडप्रमाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात उपजिल्हा रुग्णालयांमध्ये या ओपीडी सुरू होणार आहेत. दोन्ही शहरे आणि जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख ५३ हजार नागरिक हे उपचारांनंतर बरे होऊन घरी गेले आहेत’, अशी माहितीही राव यांनी दिली.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here