अटक केलेल्या विद्यार्थ्याचे नाव मसूद अहमद असे आहे. बहराइच जिल्ह्यातील जरवाल रोड इथला तो राहणारा आहे. मसूद अहमद हा दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियामध्ये एलएलबीचा विद्यार्थी आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो कॅम्पस फ्रेंड्स ऑफ इंडियाशी संबंधित आहे. जी पॉप्युलर फ्रेंड ऑफ इंडियाची विद्यार्थी संघटना आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
यापूर्वी हाथरस सामूहिक बलात्काराच्या संदर्भात उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी पोस्टर्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं म्हटलं होतं. जातीय हिंसाचार पसरवण्याच्या उद्देशाने सरकारला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करणार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं प्रशांत कुमार यांनी सांगितलं होतं.
हाथरसच्या घटनेवरून काहींनी सामाजिक सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हाथरसच्या चांदपा पोलिस ठाण्यात या संदर्भातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हाथरसमध्ये तैनात पोलीस अधिकाऱ्यांशी वाद घातल्या प्रकरणी बॅरिकेडिंग तोडल्याबद्दलही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं प्रशांत कुमार यांनी सांगितलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times