वाचा:
गेल्या सात महिन्यांपासून करोनाच्या भयंकर संकटाशी लढत आहे. देशात सर्वाधिक करोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात असून सरकारच्या अथक प्रयत्नांमुळे करोनाचा स्फोट टळला असला तरी स्थिती मात्र अद्याप नियंत्रणात आलेली नाही. राज्यात अजूनही करोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. त्यामुळेच सर्वच आघाड्यांवर आवश्यक खबरदारी घेण्याचे सरकारचे स्पष्ट निर्देश आहेत.
राज्यातील गेल्या काही दिवसांतील आकडे काहिसा दिलासा देणारे ठरले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ( ) ८० टक्केपार गेल्यानंतर त्यात आजही काही प्रमाणात वाढ झाली व हे प्रमाण ८०.४८ टक्के इतके झाले. आज दिवसभरात १७ हजार १४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत तब्बल ११ लाख ७९ हजार ७२६ रुग्णांनी करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे.
वाचा:
राज्यात आतापर्यंत ७२ लाख ४१ हजार ३७६ जणांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यातील १४ लाख ६५ हजार ९११ म्हणजे २०.२४ टक्के चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज दिवसभरात १२ हजार २५८ नवीन रुग्णांची भर पडली असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता २ लाख ४७ हजार २३ इतकी झाली आहे. राज्यात सध्या २२ लाख ३८ हजार ३५१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर २५ हजार ८२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
हा अजूनही चिंतेचा विषय आहे. आज एकूण ३७० करोना मृत्यूंची नोंद झाली असून आतापर्यंत या साथीने ३८ हजार ७१७ जणांचा बळी घेतला आहे. आज सर्वाधिक ४७ मृत्यूंची नोंद महापालिकेच्या हद्दीत झाली. राज्यातील करोना मृत्यूदर सध्या २.६४ टक्के असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times