On : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅकने तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने आज दि. ६ ऑक्टोबर २०२० रोजी व उद्या दि. ७ ऑक्टोबर २०२० रोजी होणारे परीक्षेचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. या परीक्षेच्या तारखा लवकरच ठरवून त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर व आयडॉलच्या लिंकवर प्रदर्शित केल्या जाणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले आहे.

ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर अटॅक आढळला आहे. त्यादृष्टीने विद्यापीठ तक्रार नोंदविणार आहे. यामुळे या परीक्षांमध्ये हि तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.

दि. ३ ऑक्टोबर २०२० पासून दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या परीक्षेस सुरुवात झाली. आज या परीक्षेचा दुसरा पेपर होता. तांत्रिक अडचणीमुळे आजचे हे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. तसेच उद्या दि. ७ ऑक्टोबर २०२० रोजी होणाऱ्या परीक्षा तृतीय वर्ष बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, तृतीय वर्ष बीएस्सी आयटी सत्र ६ व बॅकलॉगच्या परीक्षा प्रथम व द्वितीय वर्ष बीए व बीकॉम, एमसीए सत्र १ व सत्र २ या परीक्षाचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. दिनांक ६ व ७ ऑक्टोबर २०२० रोजीच्या या परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

विद्यार्थ्यांचा संताप…

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षेला शनिवारपासून सुरुवात झाली. परंतु पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांना परीक्षेची लिंक, लॉगइन आयडी व पासवर्ड मिळत नसल्याचा प्रकार मंगळवारी तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. आर्ट्स व कॉमर्सच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा तांत्रिक कारणामुळे अचानक रद्द करण्यात आल्या. त्यामुळे गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी थेट आयडॉलकडेच धाव घेतली. मात्र कोणतेच उत्तर नसल्याने आयडॉलचे दरवाजे बंद करत प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयडॉलबाहेर जमा होत आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर रात्री उशिरा विद्यापीठाने सायबर हल्ल्यासंबंधीची माहिती जाहीर केली.

हेही वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here