आमचं सरकार होतं तेव्हा आपल्या देशात पाऊल टाकण्याचीही चीनची हिंमत नव्हती. संपूर्ण जगात आज एकच देश आहे, जिथे दुसर्या देशाचे सैनिक घुसले आहेत आणि भ्याड पंतप्रधान म्हणतात की आपल्या देशाच्या एक इंच जमिनीवर कुणीही कब्जा केलेला नाही, असं हरयाणाच्या कुरुक्षेत्र येथे राहुल गांधी म्हणाले.
भारताच्या सीमेवर घुसखोरी करण्याची हिंमत चीनमध्ये कुठून आली? याचं कारण म्हणजे चीन बाहेरून बघितलं आहे. नरेंद्र मोदींनी देश कमकुवत केल्याचं चीनला माहित आहे. करोनाच्या वेळी भारताचे पंतप्रधान अपयशी ठरले. देशातील शेतकरी आणि मजुर दुबळे झाले आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ‘खेती बचाओ यात्रे” दरम्यान राहुल यांनी कुरुक्षेत्रच्या गीतास्थळावर प्रार्थनाही केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times