महानगर शिवसेनेतील गटबाजी कमी करण्यासाठी संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. मात्र बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे नीलेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रक काढून महानगरप्रमुख यांच्यावर थेट आरोप केले आहेत.
वाचा:
शिवसेनेत संपर्क प्रमुखांनी शिवसेनेमध्ये काय चालू आहे, याची माहिती शिवसेनेच्या शहरातील कार्यकर्त्यांकडून घ्यायला हवी होती. कार्यकर्त्यांना बोलावून त्यांच्या भावना जाणून घेणे गरजेचे होते. मात्र तसे झाले नाही. महानगरप्रमुखांनी शिवसेना पक्ष त्यांच्या पुरता लिमिटेड करून ठेवला आहे, असा आरोप नीलेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे. शरद तायडे फक्त त्यांच्या मर्जीतील लोकांना आंदोलनाला व कार्यक्रमाला बोलवत असतात. जळगाव जिल्ह्यातील नेते सुरेश जैन यांनी ४० वर्षे जिल्ह्याच्या विकासासाठी काम केले आहे व जिल्ह्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. अशा नेत्याचा फोटो सुद्धा महानगरप्रमुखांनी शिवसेना पक्षाने दिलेल्या अॅम्ब्युलन्सवर टाकलेला नाही, अशा शब्दांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
वाचा:
शहरातील पक्ष कार्यालय गेल्या अनेक दिवसांपासून बंदच आहे. पक्षातील बरेच कार्यकर्ते आपल्या आपल्या गल्लीत बसून पक्ष चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्या गल्लीतून शहराचे प्रश्न सुटत नाहीत, याचे भान कुणालच उरलेले नाही. गेल्या काही दिवसांत लॉकडाऊनमुळे जनतेची बरीच कामे रखडली आहेत. त्यावर कोणी समोर यायला तयार नाही. जर महानगरप्रमुख अशा पद्धतीने वागत असतील तर सर्वसामान्य शिवसैनिकाचं काय?, असा प्रश्न नीलेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.
महानगरप्रमुखांकडून जनतेच्या हिताच्या प्रश्नांसाठी आजपर्यंत ठोस असे एकही आंदोलन झालेले नाही. अशावेळी आम्ही लोकांच्या हितासाठी आंदोलन करत असू व त्यांचे प्रश्न सोडवत असू तर त्यात गैर काय आहे?, असेही पाटील यांनी काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. जे शिवसेनेचे कार्यकर्ते लोकहिताच्या प्रश्नाच्या वाचा फोडण्यासाठी पुढे येत आहे त्यांना डावलण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. या सर्व गोष्टींची शहनिशा करून शिवसेनेच्या नवीन आणि जुन्या कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय थांबवावा, अशी मागणी नीलेश पाटील यांनी केली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times