नवी दिल्लीः लडाखमध्ये चीन सीमेवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या जवानांना लवकरच अमेरिकन बनावटी सिग सॉर अ‍ॅसॉल्ट रायफल मिळणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अमेरिकेकडून ७२, ५०० सिग सॉर अ‍ॅसॉल्ट रायफल्स खरेदीस मान्यता दिली आहे. या सौद्यात कुठल्याही प्रकारची दिरंगाई होऊ नये म्हणून फास्ट ट्रॅक प्रक्रियेनुसार रायफल खरेदी केल्या जाणार आहेत.

सिग सॉर अ‍ॅसॉल्ट रायफल्स पहिल्या लॉटमधील रायफल जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांना देण्यात आल्या होत्या. आता दुसर्‍या लॉटमध्ये येणाऱ्या रायफल चीनच्या सीमेवर पूर्व लडाखमध्ये तैनात असलेल्या जवानांना देण्यात येणार आहेत.

इन्सास रायफलच्या बदल्यात या नवीन रायफल खरेदी केल्या जात आहेत. या इन्सास रायफल ऑर्डिनन्स फॅक्टरीत बनवल्या जातात. सरकारच्या योजनेनुसार, दहशतवादविरोधी मोहीम, पाकिस्तानशी लागून असलेल्या एलओसीवर आणि चीनला लागून असलेल्या एलएसीवर तैनात असणाऱ्या भारतीय जवानांना सुमारे दीड लाख आयात रायफल दिल्या जाणार आहेत.

अमेठीत बनवणार AK 203 रायफल

भारतीय लष्करातील उर्वरीत जवानांना AK -203 रायफल पुरवल्या जातील. अमेठीमधील ऑर्डिनन्स फॅक्टरीत या रायफल भारत आणि रशियाच्या संयुक्तपणे तयार करतील.

१६००० लाइटवेट मशिन गनची ऑर्डर

इन्सास रायफलच्या जागी दुसऱ्या रायफल बदलण्याची प्रक्रिया भारतीय लष्करात सुरू आहे. पण काही कारणांमुळे त्याला उशीर झाला आहे. अलिकडेच, संरक्षण मंत्रालयाने इस्रायलकडून १६००० लाइट मशीन गन खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून लष्करातील त्यांची कमतरता दूर होईल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here