‘कोव्हिड-१९ प्रतिबंधात्मक लशीचे व्यवस्थापन आणि वाहतुकीसाठी तयार करण्यात आला असून, त्यावर लशीचा साठा आणि उपलब्धता याची तत्काळ माहिती उपलब्ध होणार आहे,’ असे केंद्र सरकारे मंगळवारी सांगितले. लशीकरणाच्या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्यांसाठी ऑनलाइन प्रशिक्षणही देण्यात येणार असल्याचेही सरकारने सांगितले.
सर्व माहिती एकाच ठिकाणी
‘कोव्हिड-१९’च्या लशीकरणासंदर्भात सरकारने इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क (ईव्हीन) तयार केले आहे. त्याद्वारे लशीचे व्यवस्थापन व वाहतूक केली जाणार आहे. लस मागविण्यापासून ते साठवणे आणि लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था ‘ईव्हीन’मार्फत होणार आहे. पुढील वर्षी जुलैपर्यंत सरकार लशीचे ४० ते ५० कोटी डोस घेणार असून, त्याद्वारे २० ते २५ कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. लस मिळवण्यासाठी राज्यांना या महिनाअखेरीपर्यंत ज्यांना प्राधान्याने लस द्यायची आहे, त्यांची यादी पाठविण्याची सूचना करण्यात आली आहे. लशीकरणाची मोहीम सुरू करताना मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज लागणार आहे. त्या दृष्टिने तयारी करण्यात येत असून, या मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्याच्या पद्धती विकसित करण्यात येत आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली.
वर्षअखेरीस लस
दरम्यान, ‘कोव्हिड-१९’वरील लस या वर्षअखेरीस उपलब्ध असेल, अशी आम्हाला आशा आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. मात्र, याचा अधिक तपशील ‘डब्लूएचओ’चे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी दिला नाही. ‘डब्ल्यूएचओ’च्या कोव्हॅक्स कार्यक्रमानुसार प्रायोगिक तत्त्वावर नऊ लशी तयार होत आहेत. २०२१च्या अखेरीपर्यंत दोन अब्ज डोस वितरित करण्याचे उद्दिष्ट आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times