म. टा. प्रतिनिधी, पुणेः राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक या समाजाच्या सर्व क्षेत्रात जाती- धर्माचे विष कालवले गेले आहे. जाती, धर्माच्या नावाने घाण पसरली आहे. आम्हाला चित्रपट दाखवा, तो मान्य असेल तरच प्रदर्शित होईल, हा गाढवपणा देशात सुरू आहे. सरकारी सेन्सॉरशीप असताना या खासगी सेन्सॉरशीपची आवश्यकता नाही. आपण सगळेच दहशतवादी झालो आहोत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.

१८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोखले यांना पिफ डिस्टिंग्विश्ड पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित वार्तालपात ते बोलत होते. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. ‘महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष’ही या वर्षीच्या महोत्सवाची ‘थीम’ आहे.

दरम्यान, ‘१ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली या गोष्टीला यावर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. भारताचा विचार केला तर महाराष्ट्र हे राज्य सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न व अग्रेसर आहेच याबरोबरच याच राज्यात ख-या अर्थाने चित्रपट सृष्टी आणि या क्षेत्रातील दादासाहेब फाळके यांसारखे प्रणेते देखील जन्माला आले. इतकेच नाही तर चित्रपट सृष्टीचा विस्तार देखील याच राज्यात मोठ्या प्रमाणात झाला आहे. म्हणूनच राज्याच्या सांस्कृतिक मूल्यांचे दर्शन आम्ही यावर्षीच्या महोत्सवात घडविण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशी माहिती डॉ. जब्बार पटेल यांनी दिली

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here