मुंबईः सुशांतसिंह राजपूत राजपूत प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या रिया चक्रवर्तीची तब्बल एक महिन्यानंतर कारागृहातून सुटका होणार आहे. ड्रग्ज प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या रियाला आज मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. यावेळी माध्यमांनी तिचा पाठलाग करु नये अशी सूचना मुंबई पोलिसांनी केली असून मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहन जप्त करण्यात येईल, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

ड्रग्ज प्रकरणी ८ सप्टेंबरला एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली होती. रियासोबत दिपेश सावंत आणि सॅम्यअल मिरांडा यांचाही जामीन हायकोर्टानं मंजूर केला आहे. रियाची १ लाखांच्या जामीनावर तर दीपेश सावंतची ५० हजारांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र, रियाचा भाऊ शौविक आणि अब्देल परिहार यांचे जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळले आहेत. रिया जेलमधून बाहेर आल्यानंतर माध्यमांनी तिच्याससमोर गर्दी करू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

वाचाः

‘कोणत्याही प्रकारचा पाठलाग, अडवणूक किंवा रस्त्यावर सिग्नलला गाडी उभी असताना जाऊन त्यांची मुलाखत किंवा त्यांचे चित्रीकरण करणं कायद्यानं गुन्हा आहे. यामुळं तुम्ही स्वतःचे आणि रस्त्यावरील इतर वाहनचालकांचे जीव धोक्यात घालत असता. याबाबत मुंबई पोलीस कडक कारवाई करणार आहेत,’ असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.

वाचाः

‘कोणत्याही पद्धतीनं पाठलाग, अडवणुकीला प्रोत्साहन देऊ नका. चालकाबरोबरच जो त्याला अशा पद्धतीनं वागण्याच्या सूचना देत आहेत किंवां तसं वागण्यास भाग पाडत आहेत त्यावरही कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन होत असल्यास मोटार वाहन कायद्यांतर्गंत वाहन जप्त करण्याचा अधिकार असून ही कडक कारवाई असेल,’ असंही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here