मुंबईः लॉकडाऊनच्या काळात जिम मालकृचालक, मुंबईतील डबेवाले अशा विविध क्षेत्रातील लोकांनी यांची भेट घेतली होती. त्यानंतर पेणमधील ही केंद्र सरकारने प्लॅस्टर ऑफ पॅरिस (POP) वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी उठवावी या मागणीसाठी मूर्तीकारांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे.

करोनाच्या संकटाच्या काळात लॉकडाऊनमुळं येणाऱ्या अडचणी विविध व्यावसायिकांनी व विविध क्षेत्रातील लोकांनी राज ठाकरे यांच्यासमोर मांडल्या होत्या. तसंच, यावर तोडगा काढण्याची मागणीही केली होती. त्यांच्या मागण्यांसाठी पाठपुरावा करण्याचं आश्वासनही राज यांनी दिलं होतं. यावेळेही पेणमधील मूर्तीकारांना राज ठाकरे यांनी एक महत्त्वाचा सल्ला तसंच, एक धोक्याची सूचनाही दिली आहे.

‘प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या विसर्जनानंतर पुन्हा किनाऱ्यावर येतात. ते चित्र फार भीषण असतं. त्यामुळं तुम्ही वेगळा विचार करून बघा. मी तुम्हाला धोका सांगून ठेवतो जर उद्या परदेशातून मूर्त्या आल्या तर तुम्ही काहीही करु शकत नाही,’ असा धोक्याचा इशारा राज यांनी मूर्तीकारांना दिला आहे.

‘प्लास्टर ऑफ पॅरिसमुळं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. नदी, समुद्रात ते पटकन विरघळत नाही. विसर्जनानंतर चौपाट्यांवर अनेक गणपतीच्या मूर्त्या दिसतात. आपण इतक्या श्रद्धेनं त्या बाप्पाची पूजा करतो. त्याचे विसर्जन करतो दुसऱ्या दिवशी त्या मूर्त्या पुन्हा किनाऱ्यावर आलेल्या असतात. हे चित्र फार भीषण असतं. त्यामुळं तुम्हाला जसं जमेल तितक्या शाडूच्या किंवा मातीच्या मूर्ती बनवणं हे जास्त संयुक्तिक असेल,’ असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे.

‘तुम्ही मूर्ती बनवण्याच्या दृष्टीनं वेगळा काही मार्ग निघतो का याचा विचार करा त्याविषयी मी सरकारमधील संबंधित व्यक्तीशी चर्चा करेन. समुद्रात विसर्जनासाठी याचा काही वेगळा पर्याय निघेल का, याविषयी मी चर्चा करेन,’ असं अश्वासन राज ठाकरेंनी मूर्तीकारांना दिलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here