मुंबई- आज ७ ऑक्टोबर रोजी त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. रेणुका यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अभिनेत्री माधुरी दीक्षितने एक वेगळी शक्कल लढवली. माधुरीने दोघींचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. यात दोघीही ‘हम आपके हैं कौन’ सिनेमातील गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

माधुरी दीक्षितने रेणुका शहाणे यांच्यासाठी लिहिला प्रेमळ मेसेज
माधुरीने व्हिडिओ शेअर करत पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझ्या तुझ्यासोबतच्या बर्‍याच आठवणी आहेत, ज्या कायम जिवंत राहतील. ‘हम आपके हैं कौन’ ते ‘बकेट लिस्ट’पर्यंत तुझ्यासोबत वेळ घालवणं हा नेहमीच मजेशीर अनुभव असतो. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि हे वर्ष तुझ्यासाठी खूप चांगलं असो.’

अचानक उठून नाचू लागल्या माधुरी आणि रेणुका

या व्हिडिओमध्ये दोघीही एका कार्यक्रमात एकत्र बसलेल्या दिसत आहेत. तेव्हाच ‘हम आपके हैं कौन’ सिनेमातील ‘लो चली में’ हे गाणं वाजू लागतं. ते गाणं ऐकताच माधुरी आणि रेणुका उठतात आणि थेट नाचू लागतात. माधुरी आणि रेणुका या सिनेमात बहिणी दाखवल्या होत्या. हा सिनेमा सुपरहिट झाला होता. आजही या सिनेमातली गाणी तेवढीच हिट आहेत. लग्नसमारंभाला या सिनेमातील गाणी आवर्जुन वाजवली जातात.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here