मुंबईः सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणाशी संबंधित पोस्ट टाकण्यासाठी फेसबुक आणि ट्वीटरवर ८० हजार फेक अकाउंट्स उघडण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. असं असतानाच राज्याचे गृहनिर्माण मंत्री यांच्या नावे फेक अकाउंट सुरू केल्याचं समोर आलं आहे.

१४ जून रोजी वेगवेगळ्या सोशल माध्यमांमध्ये तब्बल ८० हजार बनावट खाती तयार करण्यात आली होती. त्याद्वारे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर मुंबई पोलीस व महाराष्ट्र सरकारविरोधात अपप्रचार केला जात होता. असभ्य भाषेचा वापर केला जात होता. पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी या संदर्भात तपास करण्याचे आदेश सायबर सेलला दिले होते. हा मुद्दा चर्चेत असतानाच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट सुरू केलं असून त्याच्या प्रोफाइलवर पंतप्रधान मोदींचा फोटो आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी त्या फेक अकाउंटचा फोटो अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला आहे. ‘हे फेक अकाउंट असून त्याचा चुकीचा वापर केला जात आहे. या फेक अकाउंटची तक्रार आपण मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, महाराष्ट्र , ठाणे पोलिसांकडे तक्रार केली आहे.’ असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.

दरम्यान, मुंबई पोलीस दल व आयुक्त परमबीर सिंह यांच्या बदनामीसाठी सोशल मीडियात तब्बल ८० हजार बनावट खाती उघडण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलीस आयुक्तांनी सायबर सेलला याची चौकशी करण्याचे आदेश दिले असून सायबर सेलनं या प्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत दोन गुन्हे नोंदवले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here