मुंबईः आमचं सरकार असतं तर चिन्यांना १५ मिनिटांत बाहेर फेकून दिलं असतं, असं विधान करणाऱ्या यांच्यावर भाजप नेते यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी कधी हुशार होणार, असा सवाल करत निलेश राणे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

भारत- चीन सीमेवरील तणावावरून देशात सध्या राजकारण तापलं आहे. यावरूनच राहुल गांधी यांनी पंतप्रधान स्वतःला देशभक्त म्हणवतात आणि संपूर्ण देशाला माहिती आहे चीनी सैनिक भारताच्या हद्दीत घुसले आहेत. मग हे कसले देशभक्त? असा सवाल केला आहे. यावरून निलेश राणे यांनी खोचक टीका केली आहे.

‘राहुल गांधी म्हणतात आमची सत्ता असती तर १५ मिनिटांत चीनला बाहेर फेकलं असतं. चीनचं राहू द्यात तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे. आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराच्या बाहेर काढून दाखवा,’ असं ट्विट निलेश राणे यांनी केली आहे.

‘राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे. जेव्हा काँग्रेसचे ए.के अँटनी संरक्षणमंत्री होते तेव्हा चीननं भारताच्या काही भागांत घुसखोरी केली होती. पण, ए.के अँटनीनं हसत उत्तर दिलं, आमच्या चर्चा सुरू आहेत. चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. असं म्हणत राहुल गांधी कधी होणार?’, असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here