म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: उपचारासाठी शिल्लक बेड, चाचण्या आणि पॉझिटिव्ह रूग्णांचे कमी झालेले प्रमाण, शंभरावर गावांनी करोनामुक्तीचा सोडलेला श्वास, मृत्यूचे घटलेले प्रमाण या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचा करोनाचा विळखा सैल होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यामुळे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेची हतबलता कमी झाली आहे. एकीकडे अनलॉक होत व्यवहार सुरळीत होत असताना दुसरीकडे करोनाचा संसर्ग कमी होत असल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात जूनपर्यंत करोनाचा फार मोठा संसर्ग नव्हता. पण त्यामुळे करोनाची लागण झालेल्या रूग्णांना उपचारासाठी रूग्णालयात सोय होत होती. त्यांना बेड मिळत होते. ऑक्सीजन अथवा व्हेंटिलेटरसाठी त्यांना प्रतिक्षा करावी लागत नव्हती. पण जुलै महिन्यात जिल्ह्यात करोनाचा कहर सुरू झाला. पाच हजारावर लोकांना करोनाची बाधा झाल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली. बेड मिळत नसल्याने उपचार करणे कठीण झाले. यामुळे उपचाराअभावी अनेकांचा तडफडून जीव गेला. जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील याबाबत बैठक घेऊन चिंता व्यक्त केली.

वाचाः

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात हीच परिस्थिती होती. त्यानंतर मात्र परिस्थिती बदलत गेली. गेल्या पंधरा दिवसात रोज करोनाबाधित आणि मृतांचा आकडा कमी होत आहे. रोज एक हजारावर आढळणाऱ्या बाधितांचा आकडा आता दोनशे ते तीनशेपर्यंत खाली आला आहे. मृतांचा आकडाही ३५ ते ४० वरून १० ते १५ पर्यंत आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तीन महिने उपचारासाठी बेड, ऑक्सीजन, व्हेंटिलेटर मिळत नव्हते, आता मात्र सर्वच दवाखान्यातील बहुतांशी बेड शिल्लक आहेत.

वाचाः

रोज बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. शंभरावर गावे करोनामुक्त

आत्तापर्यंत ४६ हजारावर लोकांना करोनाची बाधा झाली असून १५०२ जणांचा बळी घेतला. ३७ हजार २९३ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ७२२० रुग्णावर उपचार सुरू आहेत. लोकांच्या मनातील भीती कमी झाली असून बहूतेकजण घरीच उपचार करत करोनामुक्त होत आहेत. अनलॉकमुळे व्यवहार सुरळीत होत असताना करोनाचा विळखा सैल झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

महिन्यानुसार करोना बाधित संख्या

मार्च – २ , एप्रिल – १२ , मे – ५९३ , जून – २४३, जुलै – ५,४६२, ऑगस्ट – १७,७३८, सप्टेंबर- २०,५०३

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here