नवी दिल्लीः नेपाळने बुधवारी चीन सीमेवर एक नवीन बॉर्डर आउट पोस्ट (BOP) बनवली आहे. ही चौकी तात्पुरत्या स्वरुपातील आहे. पण नेपाळच्या चीनबरोबरच्या व्यापाराव्यतिरिक्त सुरक्षेसाठीही ही चौकी महत्त्वपूर्ण मानली जातोय. ही सीमावर्ती चौकी ट्रायजंक्शनजवळ आहे. म्हणजेच भारत-नेपाळ आणि चीनची सीमा असलेल्या ठिकाणाजवळ आहे. ही चौकी भारताच्या सिक्कीमला लागून एका परिसरात आहे.

नेपाळने ही चौकी (BOP) तापलेजुंग जिल्ह्यातील ओलंगचुंगोला गावात बनवली आहे. आता नेपाळचे सशस्त्र पोलिस दल तिथे तैनात असेल. नेपाळ वृत्तपत्र ‘नया पत्रिका’मध्ये हे वृत्त देण्यात आलं आहे. ही बीओपी तात्पुरती आहे. सशस्त्र पोलिस दलाच्या उपस्थितीमुळे सीमा सुरक्षित राहील. त्याचबरोबर चीनसोबत व्यापारीचा मार्गही उघडला जाईल असं तेथील नागरिकांना वाटत असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

दशकांपूर्वी नेपाळ आणि तिबेटमध्ये खुला व्यापार होता तेव्हा नेपाळच्या या भागातून तिबेटला मालाची वाहतूक केली जायची आणि तिबेटहून नेपाळला माल आणला जायचा. ओलांगचुंगोला गावातील ग्रामस्थ चीनच्या भागात जावून मालाची ने आण करतात. पण यासाठी चीनची परवानगी आवश्यक आहे. चीन कधी सीमा खुली करतो तर कधी बंद, असं वृत्तात नमुद करण्यात आलं आहे. तापलेजुंगा जिल्हा मुख्यालय ते ओलांगचुंगोलापर्यंत रस्ताही तयार करण्यात येत आहे. बीओपी बनवल्यामुळे व्यापाराचा मार्गही खुला होईल अशी आशा व्यक्त केली जातेय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here