शिमला: मणिपूर आणि नागालँडचे माजी राज्यपाल आणि अश्वनी कुमार हे बुधवारी संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आले. शिमला येथे अश्विनी कुमार ( वय ७० ) यांनी आपल्या घरात गळफास घेतल्याचं आढळू आले. शिमलाचे पोलीस अधीक्षक मोहित चावला यांनी ही माहिती दिली.

पण अश्विनी कुमार यांनी आत्महत्या केली की दुसरं काही कारण आहे, हे स्पष्ट झालेलं नाही. अश्विनी कुमार हे हिमाचलच्या सिरमौर येथील राहणारे होते. १९७३ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सीबीआयचे संचालक, हिमाचल प्रदेशचे डीजीपी यांसह अनेक पदांवर त्यांनी काम केलं होतं.

हिमाचलचे पोलिस महासंचालक असताना त्यांनी मोठ्या सुधारणा केल्या.
२००६ मध्ये हिमाचल प्रदेश पोलिसांच्या डीजीपीचा कार्यभार घेतल्यानंतर अश्विनी कुमार यांनी अनेक सुधारणा केल्या. हिमाचल पोलिसांचे डिजिटलायझेशन आणि स्टेशन स्तरावर संगणकाचा वापर त्यांनी सुरू केला. त्यांच्या कारकिर्दीतच तक्रारींची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. यामुळे दुर्गम भागातील रहिवाशांना पोलिस ठाण्यात धाव घेण्यास अडथळा दूर झाला.

सीबीआय संचालक बनणारे हिमाचलचे पहिले अधिकारी

पोलिस अधिकारी अश्विनी कुमार यांना जुलै २००८ मध्ये सीबीआय संचालक झाले होते. सीबीआय संचालक म्हणून काम करणारे अश्विनी कुमार हे हिमाचल प्रदेशातील पहिले पोलिस अधिकारी होते. मे २०१३ मध्ये तत्कालीन यूपीए सरकारने प्रथम त्यांना नागालँडचे राज्यपाल केलं आणि त्यानंतर जुलै २०१३ मध्ये त्यांना मणिपूरचे राज्यपाल करण्यात आलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here