वाचा:
मुंबईत ११ मार्च रोजी करोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यांनतर तीन आठवड्यांनी म्हणजे एप्रिलमध्ये धारावीत बालिगा नगर परिसरात पहिला करोना रुग्ण सापडला. पाठोपाठ जूनपर्यंत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले. धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असल्याने तिथे संसर्ग वाढत राहिल्यास संपूर्ण मुंबईत पसरण्याची भीती होती. त्यामुळे राज्य सरकार, पालिकेने आपली आरोग्य यंत्रणा, लोकसहभाग आणि खासगी वैद्यकीय सेवेची मदत घेऊन धारावीत उपाययोजना सुरू केल्या.
वाचा:
नागरिकांची तपासणी, वेळीच रोगाचे निदान व तात्काळ उपचारामुळे जुलै २०२० मध्ये धारावीत करोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली, असे निरीक्षण जागतिक बँकेने आपल्या ‘गरीबी आणि सामायिक समृद्धी’ या द्वैवार्षिक अहवालात नोंदविले आहे. अडीच चौरस किलोमीटर वस्तीमध्ये दाटीवाटीने वसलेल्या साडेआठ लाख लोकसंख्येच्या धारावीत गेले तीन महिने करोना नियंत्रणात असणे हे एक मोठे आश्चर्यच असल्याचे बँकेने म्हटले आहे.
वाचा:
धारावी पॅटर्नचे यापूर्वी , यांनी कौतुक केले असून धारावीप्रमाणे करोनाविरुद्ध लढा देण्याचा सल्ला अन्य देशांना दिला आहे. धारावीत यशस्वी ठरलेली संसर्गाचा पाठलाग ही मोहीम सध्या फिलिपिन्स सरकार तेथील झोपडपट्ट्यांमध्ये राबवित आहे. मागील महिनाभरापासून मुंबईत पुन्हा करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. मात्र धारावीत रुग्णसंख्या अद्याप नियंत्रणात आहे. याबाबत जागतिक बँकेने पालिकेच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times