राहुल गांधी यांनी व्हिडिओ शेअर करत युपी सरकारवरही निशाणा साधला आहे. ‘हाथरस पीडितेच्या कुटुंबाला युपी सरकारच्या शोषण आणि अत्याचाराचा कसा सामना करावा लागला, पाहा. हाथरस पीडित कुटुंबावर झालेल्या अन्यायाचे सत्य प्रत्येक भारतीयाला कळणं महत्वाचं आहे’, असं राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे.
या व्हिडिओमध्ये राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबाशी बोलताना दिसत आहेत. अंत्यसंस्कारापूर्वी मुलीचा चेहरा देखील पाहू दिला नाही. जिल्हाधिकाऱ्यांवरही गुंडगिरी केल्याचा आरोप पीडित कुटुंब या व्हिडिओतून करताना दिसत आहे. राहुल गांधी आणि कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली होती. यावेळी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याच्या लढाईत सर्वतोपरी मदत करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं.
हाथरस प्रकरणावरून राज्यात जातीय आणि धार्मिक दंगलीचे षडयंत्र रचल्याचा दावा युपी सरकारने केला होता. या प्रकरणात युपी पोलिसांनी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या चार सदस्यांना अटकही केली आहे. दंगलीसाठी मॉरिशसमधून ५० कोटींचा निधी मिळाला होता. एकूण निधी १०० कोटींपेक्षा जास्त असेल, असं ईडीने सुरवातीच्या तपासात म्हटलं होतं.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times