जळगाव: भाजपचे ज्येष्ठ नेते आपल्याला न्याय मिळत नसल्याच्या भावनेतून नाराज आहेत. सध्या त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू आहे. जळगावात त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत वातावरण निर्मिती सुरू आहे. बुधवारी दुपारनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला असून त्यातून अनेक संकेत मिळू लागले आहेत. खडसेंच्या फोटो सोबत राष्ट्रवादीचे गीत या व्हिडिओत वापरण्यात आले आहे. ( Leader ‘s Video Went Viral )

वाचा:

नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे मुंबईत असल्याने ते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष यांची भेट घेणार असल्याची चर्चा होती. यासाठीच जळगावात खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत वातावरण निर्मिती सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी दुपारनंतर जळगावात खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हॉट्सअॅपच्या अनेक राजकीय ग्रुपमध्ये हा व्हिडिओ टाकण्यात आला. गतकाळात झालेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे असलेले पक्षाचे गीत या व्हिडिओत टाकण्यात आले असून त्यात खडसेंची प्रसन्न भावमुद्रा असलेला एक फोटोही जोडलेला आहे. या व्हिडिओने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, त्याचीच चर्चा सर्वत्र होत आहे. दरम्यान, हा व्हिडिओ कुणी बनवला, कुणी व्हायरल केला, याची मात्र कोणत्याही प्रकारची खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही.

वाचा:

दरम्यान, खडसेंनी मात्र मुंबईत आपण उपचारासाठी आल्याचे सांगितले आहे. आज मुंबईत होणाऱ्या भाजपच्या बैठकीला ते उपस्थित राहणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे खडसेंच्या मनात नेमके काय चाललेय?, खडसे राजकीय भूकंप करणार का?, असे अनेक प्रश्न तूर्त अनुत्तरितच आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here