नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासात बुधवार हा महत्त्वाचा दिवस होता. आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर पंतप्रधान म्हणून बुधवारी सलग १९ वर्षे ते सरकारचं नेतृत्व करत आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधान म्हणून त्यांचं हे २० वं वर्ष सुरू झालं आहे. यावेळी त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन केलं. यावर पीएम मोदींनी ट्वीट केलं. यालाच आपले प्राधान्य आहे आणि कायम राहील, असं म्हणत त्यांनी सर्वांचे आभार मानले.

पंतप्रधान मोदींनी एकामागून एक सलग ट्विट केले. इतक्या दिवसांपासून जनतेने आपल्याला जबाबदारी सोपवली आहे, ती पार पाडण्यासाठी पूर्ण स्वतःला झोकून देऊन आपण प्रयत्न केले आहेत, असं मोदी म्हणाले.

‘लहानपणापासूनच माझ्या मनात एक गोष्ट जोपासली गेली आहे. जनता-जनार्दन हे देवाचे रूप आहे आणि लोकशाहीमध्ये ते देवाइतके शक्तिशाली आहेत. इतक्या दीर्घ काळासाठी, देशवासीयांनी माझ्यावर ज्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत, त्यासाठी मी पूर्णपणे प्रामाणिक आणि समर्पित प्रयत्न केले आहेत, असं ते म्हणाले.

पुढच्या ट्वीटमध्ये पंतप्रधान मोदींनी हितचिंतकांबद्दल आभार व्यक्त केले. ‘देशाच्या कानाकोपऱ्यातून दिलेले आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल आभर व्यक्त करण्यासाठी आज माझी शब्दांची शक्ती कमी पडत आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेमामुळे आपण सर्वांनी देशसेवा करण्याचा, गरीबांचे कल्याण करण्याचा संकल्प आणखी दृढ करुन भारताला नव्या उंचीवर नेले आहे. आपल्यात काहीच उणीवा नाहीत, असं कोणीही म्हणू शकत नाही. अशा महत्त्वाच्या आणि जबाबदार पदांवर दीर्घकाळापर्यंत… एक माणूस म्हणून माझ्याकडूनही चुका होऊ शकतात. मला सर्व सीमा आणि मर्यादा असूनही तुमचे प्रेम निरंतर वाढत आहे, हे माझे भाग्य आहे, असं मोदी म्हणाले. जनतेचा आशीर्वाद आणि प्रेमाला पात्र बनण्यासाठी प्रयत्न करत राहीन, असं म्हणाले.

नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ ला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. तेव्हापासून ते अजिंक्य आहेत. २०१ ४ मध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अधिक बळकटीने ते पुन्हा सत्तेत आले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here