बक्सरमधून भाजपची परशुराम चतुर्वेदींना उमेदवारी
गुप्तेश्वर पांडे यांना ज्या बक्सर मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती तो मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला आहे. जेडीयूने त्यांना उमेदवारी न दिल्याने भाजपकडून त्यांना बक्सरमधून उमेदवारी दिली जाईल, चर्चा होती. पण भाजपने बक्सरमधून परशुराम चतुर्वेदी यांचे नाव जाहीर केले तेव्हा त्यांच्या समर्थकांच्या आपेक्षांवर पाणी फेरलं गेलं.
मी निवडणूक लढवणार नाही – पांडे
यानंतर गुप्तेश्वर पांडे यांनी मोठं स्पष्टीकरण दिलं. “आपल्या अनेक हितचिंतकांच्या आवाहनामुळे मी अस्वस्थ झालो आहे. त्यांच्या चिंता आणि समस्या मलाही समजल्या आहेत. निवृत्तीनंतर प्रत्येकाची अपेक्षा होती की मी निवडणूक लढवावी. पण यावेळी मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही. निराश होण्याचं काहीच नाही. धीर धरा. आपलं आयुष्य संघर्षातच गेलं आहे. मी आयुष्यभर सार्वजनिक सेवेत राहीन. कृपया धीर धरा आणि मला फोन करू नका. आयुष्य बिहारच्या जनतेसाठी मी जीवन वाहिलं आहे,” गुप्तेश्वर पांडे म्हणाले.
‘बक्सरच्या नागरिकांना प्रणाम’
माझी जन्मभूमी बक्सर आहे. तिथल्या सर्व वडिलधाऱ्यांना, बंधू, भगिणी, माता आणि तरुणांसह तेथील जाती, धर्माच्या सर्व वडिलधाऱ्यांना प्रणाम आणि आपलं प्रेम आणि आशीर्वाद असू द्या, असं गुप्तेश्वर पांडे म्हणाले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times