नगर: ‘शेती, शिक्षण, सहकार आणि पाणी प्रश्नासंदर्भात संपूर्ण देशाला आपल्या विचारातून निर्णय प्रक्रियेची प्रेरणा देणारे लोकनेते पद्मभूषण यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान यांच्याा हस्ते व्हर्च्युअल सोहळ्याच्या माध्यमातून होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्री यांनाही दिले जाणार आहे.

वाचा:

‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन १३ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांना पाहाता यावा, यासाठी नगर जिल्ह्याच्या चौदाही तालुक्यांत स्क्रीन आणि प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ‘प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नामविस्तार देखील यावेळी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

नगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली येथून करणार असून, याच निमित्ताने प्रवरानगर येथे डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. करोनाच्या अनुषंगाने असणाऱ्या सर्व नियमावलींचे पालन करून हा कार्यक्रम होईल, असे विखेंनी स्पष्ट केले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत बाळासाहेब विखे यांनी काम केले होते. त्यामुळे आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला उपस्थित राहावे यासाठी मुख्यमंत्री व बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना मी स्वतः जाऊन निमंत्रण देणार आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी नमूद केले. राज्याचे विरोधी पक्षनेते , केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री गिरीष महाजन यांच्यासह खासदार, आमदार कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

वाचा:

या आत्मचरित्राचे प्रकाशन बाळासाहेब विखे पाटील यांच्या हयातीतच व्हावे, अशी आमच्या कुटुंबीयांची इच्छा होती. परंतु, त्यांच्या तब्येतीच्या कारणाने ते शक्य झाले नाही. देशाचे पंतप्रधान मोदी यांनी या आत्‍मचरित्राचे प्रकाशन लोणी येथे येवून करावे, यासाठी त्यांना आम्ही विनंती केली होती व ती त्यांनी मान्यही केली होती. त्यानुसार एप्रिल महिन्यातच हा कार्यक्रम होणार होता. परंतु, करोनामुळे तो होवू शकला नव्हता. आता हा कार्यक्रम पंतप्रधानांच्या हस्तेच १३ ऑक्टोबरला व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यूमातून होत आहे,’ असेही ते म्हणाले.

हे आत्मचरित्र ऐतिहासिक दस्तावेज ठरेल
‘नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र आणि ज्येष्ठ नेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी १९६२ पासूनच्या आपल्या् राजकीय, सामाजिक कारकीर्दीचा आढावा ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राच्या माध्यमातून शब्दबद्ध केला आहे. राज्याच्या आणि देशाच्या सर्वच राजकीय स्थित्यंतराचा आढावा तसेच वेळोवेळी घ्याव्या लागलेल्या राजकीय भूमिका परखडपणे त्यांनी मांडल्या आहेत. त्यामुळे हे आत्मचरित्र ऐतिहासिक असा दस्तावेज ठरेल,’ अशी अपेक्षा असल्याचेही माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here