‘द शो’चा सूत्रसंचालक आणि कॉमेडियन कपिल शर्मा याने बुधवारी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सोशल मीडिया अकाउंट्सवर आपल्या लेकीचे फोटो शेअर केले. यात तो आपली पत्नी गिन्नी चतरथ आणि लेकीसह दिसत आहे. कपिलने पोस्टमध्ये लिहिलंय – ‘भेटा माझ्या काळजाच्या तुकड्याला – अनायरा शर्मा हिला.’
पहिल्या फोटोत कपिल आणि गिन्नी आपल्या लेकीला न्याहाळताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत बाहुलीसारखी दिसणारी ही अनायरा खूपच क्यूट दिसत आहे. कपिलच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटी आणि त्याच्या चाहत्यांनी कमेंटस् केले आहेत. मुलीला आशीर्वादही दिले आहेत. यापूर्वीही अनायराची छायाचित्रे इंटरनेटवर वेगवेगळ्या अकाउंट्सच्या माध्यमातून व्हायरल झाली होती. पण ती छायाचित्रे सुस्पष्ट नव्हती. शिवाय ती कपिलच्या मुलीचीच आहेत, याची ठोस माहिती कुठेही नव्हती.
पिता बनल्यावर कपिलने स्वत: याची माहिती दिली होती. त्याने सांगितलं होतं, ‘आमच्या घरी मुलीचं आगमन झालं आहे आणि तुम्हा साऱ्यांचे आशीर्वाद हवे आहेत.’ कपिलने १२ डिसेंबर २०१८ मध्ये गिन्नीसोबत लग्न केल. १० डिसेंबर २०१९ रोजी गिन्नीने मुलीला जन्म दिला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times