मुंबई: राज्यातील महिल्यांच्या सुरक्षेचे मोठे कवच निर्माण करणारा ‘दिशा’ कायदा येत्या अधिवेशनात मंजूर करून घेणार, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित ‘दिशा’ कायदा अंमलबजावणी तसेच महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभूराज देसाई, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, यामिनी जाधव, डॉ. मनिषा कायंदे, विद्या चव्हाण, अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) राजेंद्रसिंह. अतिरिक्त पोलिस महासंचालक (सीआयडी) अतुलचंद्र कुलकर्णी तसंच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दिशा कायद्यासंदर्भात माता भगिनींसाठी मोठं सुरक्षा कवच निर्माण करण्यात येत असून यासंदर्भातील मसूदा अंतिम झाला आहे. याबाबत माता-भगिनी तसेच तज्ज्ञांकडून अधिक सूचना देऊन त्याचाही अंतर्भाव यात करण्याबाबतची कार्यवाही तातडीने पूर्ण करून हा कायदा येत्या अधिवेशनात मंजूर करून घेतला जाईल, असं देशमुख यांनी सांगितलं. या बैठकीत सर्व प्रकारच्या चांगल्या सूचना आलेल्या आहेत, त्याची नोंद घेवून हा कायदा अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार सरकार करत आहे, असं गृहमंत्र्यांनी सांगितलं.

या बैठकीला वरिष्ठ पोलीस अधिकारी मिलींद भारंबे, रंजन कुमार शर्मा, एन. अंबिका, डी.के. नलावडे, गृह विभाग उपसचिव व्ही. एम. भट, मविम च्या अध्यक्षा श्रीमती ज्योती ठाकरे, रूपाली चाकनकर, श्रीमती निला लिमये, शिल्पा सोनुने, राखी जाधव, उत्कर्षा रूपवते, सुदर्शता कौशिक, सक्षणा सलगर, आदिती नलावडे तसंच राज्यातील विविध पक्षांच्या महिला पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here