म. टा. प्रतिनिधी, नगरः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( shiv sena ) यांच्या काळापासून नगर शहरात शिवसेनेचे एकहाती नेतृत्व करणारे माजी मंत्री यांच्या निधनानंतर पक्षात गटबाजी उफाळून आली. महापालिकेच्या ( ) स्थायी समितीचे सभापतीपद आणि स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून पक्षांतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमिवर आता राठोड यांचे चिरंजीव विक्रम यांनी पुढाकार घेतला आहे. पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी आज एकत्र येत राठोड यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे मान्य केले असून लवकरच हे सर्वजण पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray ) यांच्या भेटीसाठी जाणार असल्याचे सांगण्यात आले.

महापालिकेतील राजकारणावरून शिवसेनेतील वाद उफाळून आले आहेत. राज्यात आघाडीचे सरकार आहे, त्यामुळे नगर शहरातही असेच राजकारण व्हावे या उद्देशाने शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी यात लक्ष घातले. राष्ट्रवादीला पाठिंबा द्यायला सांगत शिवसेनेच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतला त्यामुळे राष्ट्रवादीचा सभापती झाला. मात्र, हा उमेदवार भाजपमधून आलेला असल्याने राष्ट्रवादी आणि भाजपने मिळून शिवसेनेवर मोठी खेळी केल्याची भावना निर्माण झाली. त्यातच स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरूनही शिवसेनेत आपसांत मतभेद झाले. जातीयवाद होत असल्याचेही आरोप झाले. वरिष्ठ पातळीवर एकामागून एक तक्रारी होत आहेत. हे सर्व सुरू असताना गडाखांचे समझोत्याचे प्रयत्नही अयशस्वी होत असल्याचे दिसून आले.

आता सक्रीय झाले आहेत. त्यांच्या वडिलांसोबत तेही आजारी होते. आजारपणातून उठल्यानंतर आता त्यांनी पुढाकार घेतला आहे. पक्षाच्या नगरसेवकांची आज बैठक झाली. जे नगरसेवक राष्ट्रवादीकडे गेले किंवा झुकल्याचा आरोप होत होता, तेही यावेळी उपस्थित होते. या सर्वांनी राठोड यांचे नेतृत्व मान्य करण्याचा निर्णय घेतला. पक्षाला पुन्हा पूर्वीचे दिवस आणण्यासाठी आणि पुढचा महापौर शिवसेनेचा करण्यासाठी आमचे एकत्रित प्रयत्न राहणार असल्याचे राठोड यांनी सांगितले. हे सर्वजण लवकरच मुंबईला पक्षश्रेष्ठींची भेट घेणार असल्याचेही राठोड यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here