म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

महापालिकेच्या स्थायी, शिक्षण, सुधार, बेस्ट या वैधानिक समित्यांसह विशेष समित्यांच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला केलेल्या मदतीची बक्षिसी या दोन्ही पक्षांना दिली जाणार आहे. गोवंडी व कुर्ला या दोन प्रभाग समित्यांमध्ये सेना आपले उमेदवार उभे न करता त्या राष्ट्रवादी आणि समाजवादीच्या उमेदवारांसाठी सोडणार आहे.

पालिकेच्या वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते आपल्याकडे वळवण्यात यशस्वी ठरली. तर काँग्रेसला तटस्थ ठेवून विरोधी पक्ष म्हणून त्यांचे स्थानही अबाधित राखण्याचा प्रयत्न सेनेने केला. या बदल्यात समाजवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभाग समित्या सोडण्याची तयारी सेनेने केली आहे. समाजवादी पक्षाला गोवंडी एम/ पूर्व प्रभाग समिती आणि राष्ट्रवादीला कुर्ला एल प्रभाग समिती सोडण्यात येणार आहे. यावर्षी या दोन समित्या घेतल्यास त्यांना पुढील वर्षी विशेष समिती सोडली जाऊ शकते, अशी माहिती सेनेतील सूत्रांनी दिली.

समाजवादी पक्षाचे पालिकेतील गटनेते आमदार यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी सेनेकडून असा प्रस्ताव आला असल्याचे सांगितले. याबाबत आमचा पक्ष लवकरच सेनेला उत्तर पाठवणार आहे. त्यात आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, अशी माहिती दिली. समाजवादी पक्ष हा कष्टकऱ्यांचा, सामान्यांचा धर्मनिरपेक्ष पक आहे. भाजपसारख्या जातीयवादी पक्षाला दूर ठेवण्यासाठी आम्ही सेनेला मदत केली, असे शेख यांनी स्पष्ट केले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here