सुरत: करोनाच्या या काळात अनेक लोकांचे कामकाज ठप्प झाल्याने कसे जगावे हा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अनेक लोक बेरोजगार होऊन घरी बसलेले आहेत. आपल्या कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी, छोट्या-मोठ्या गरजा भागवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत गुजरातमधील एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या मदतीने लोकांची मदत करण्याचा एक नवा मार्ग शोधून काढला आहे. करोनाच्या काळात मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. मात्र, काही लोक असेही आहेत, ज्यांकडे मास्क विकत घेण्यापुरतेही पैसे नाहीत. हे लक्षात घेत या परोपकारी व्यक्तीने लोकांना मोफत मास्क वाटपाचे काम सुरू केले आहे.

या परोपकारी व्यक्तीचे नाव असे असून ते गुजरातमधील सुरतचे रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या पत्नीच्या मदतीने सुरत शहरात शिलाईच्या दुकानात उरलेले कपडे गोळा करून त्यापासून मास्क बनवण्याचे काम सुरू केले आहे. ज्या लोकांकडे मास्क खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत, अशा लोकांना हनुमान मास्कचे वाटप करतात. हनुमान यांच्या या कार्याची सुरत शहरात प्रशंसा होत आहे.

हनुमान यांनी आपल्या या कार्याबाबत माहिती देताना सांगितले की, ‘मी सुरत शहरामधील शिलाईच्या दुकानांमध्ये जातो. आणि तेथे उरलेले कपडे गोळा करतो. त्यानंतर त्यांचा उपयोग मास्क बनवण्यासाठी करतो. मास्क तयार झाले की मग ते मी लोकांमध्ये वाटतो. मात्र जे लोक मास्क खरेदी करू शकत नाहीत, अशा गरजू लोकांना मी ते देतो.’

क्लिक करा आणि वाचा-

गेल्या चार महिन्यांमध्ये मी आणि माझ्या पत्नीने शहरात सुमारे ६००० मास्कचे वाटप केले असल्याचे हनुमान यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा-

क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here