मुंबई: ‘आमचे सरकार असते तर चिन्यांना १५ मिनिटांत उचलून बाहेर फेकले असते असं वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते यांच्याशी पंतप्रधान यांनी बोलायला हवे. त्यांच्याकडे चीनशी लढण्याची कोणती योजना आहे याची माहिती घ्यायला हवी,’ असा टोला शिवसेनेनं हाणला आहे. (Shiv Sena advice )

चीननं लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांनी अलीकडेच मोदी सरकारवर टीका केली होती. चिनी सैन्य आमच्या हद्दीत घुसूनही पंतप्रधान इतके थंड कसे?,’ असा प्रश्न राहुल यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याची भाजपकडून खिल्ली उडवण्यात आली होती. शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून राहुल यांची पाठराखण केली आहे. ‘राहुल गांधी यांच्याकडे काही योजना असेल तर मोदींनी त्यांच्याशी संवाद साधायला हवा. शेवटी राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे. राहुल यांचे म्हणणे कुणाला बकवास वाटत असेल तर त्यांनी मोदींची अशा प्रकारची वक्तव्ये तपासून पाहायला हवीत. पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीर खेचून आणण्याची भाषा कोणी केली होती? काश्मिरी पंडितांची ‘घरवापसी’ करण्याचे वचन कोणी दिले होते. त्या वचनांचे आता काय झाले हे स्पष्ट व्हायला हवे,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाचा:

‘पाकिस्तानला उठसूट धमक्या देणारे आपण चीनच्या बाबतीत मात्र साधे त्यांचे नावही घ्यायला तयार नाही. चीनला धडा शिकवण्याची भाषा का केली जात नाही? भारताचे सैन्य सक्षम आहे, आम्हाला कमी लेखू नका हे संवाद नेहमीचे आहेत. कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यास तयार आहोत असे बोलावेच लागते, पण चिनी सैन्य आमच्या हद्दीत घुसून विसावले ही परिस्थिती नेमकी कोणती?,’ असा प्रश्नही शिवसेनेनं केला आहे.

वाचा:

‘मोदींकडून देशवासीयांना मोठ्या अपेक्षा आहेत. पाकव्याप्त काश्मीरवर तिरंगा फडकवण्याचे भाष्य त्यांनी अनेकदा केले आहे. त्यामुळं लडाखमध्ये घुसलेल्या चिनी सैन्यालाही ते मागे ढकलतील याबाबत देशवासीयांच्या मनात शंका नाही. शिवाय, कोणत्याही प्रकारचे युद्ध खेळण्याची मानसिकता सरकारमध्ये आहे हे अनेकदा सिद्ध झालेय. सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलीस व महाराष्ट्र सरकारवर हल्ले करण्यासाठी ८० हजार बनावट सोशल अकाऊंट्स उघडण्यात आली. त्यातील बहुसंख्य अकाऊंट्स नेपाळ, टर्की, सिंगापूरसह बाहेरच्या देशातून चालवण्यात आली. जे सरकार देशांतर्गत विरोधकांवर सायबर हल्ले करू शकते, त्यांना चीनशी लढणे कठीण नाही,’ असा टोलाही शिवसेनेनं हाणला आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here