राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तीन पक्षांचं सरकार आल्यापासून या सरकारच्या भवितव्याबाबत विरोधकांकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. भाजपच्या नेत्यांनी या सरकारची अनेक नामकरणं केली आहेत. कोणी या सरकारला तिघाडी सरकार म्हणते, तर कोणी रिक्षा सरकार म्हणून हिणवते. हे सरकार फार काळ चालणार नाही, असं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे.
वाचा:
अलीकडेच पुण्यात बोलताना रावासाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारला ‘अमर, अकबर, अँथोनी’ सरकार म्हटलं होतं. ‘हे सरकार आम्ही पाडणार नाही. हे अमर, अकबर, अँथनीचे सरकार आहे. ते पायात पाय घालून पडले तर आमचा दोष नाही,’ असा चिमटा दानवे यांनी काढला होता. दानवे यांच्या या टीकेला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी उत्तर दिलं आहे. ‘हेच अमर, अकबर, अँथोनी मिळून रॉबर्ट शेठला पराभूत करतील,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
‘अमर, अकबर, अँथोनी’ हा बॉलिवूडमधील एक गाजलेला चित्रपट आहे. यातील तिन्ही नायक हे वेगवेगळ्या परिस्थितीत वाढतात व कालांतरानं एकत्र येतात. हे तिघे मिळून शेवटी त्यांना दूर करणाऱ्या रॉबर्ट शेठचे मनसुबे उधळून लावतात. रॉबर्ट शेठ हा चित्रपटातील खलनायक आहे. तोच संदर्भ देत सावंत यांनी हे ट्वीट केलं आहे. #BJP4Maharashtra हा हॅशटॅग ट्वीट करत त्यांनी भाजपला रॉबर्ट शेठची उपमा दिली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times