राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणुकीसाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनिल तटकरे, के. के. शर्मा, खासदार सुप्रियाताई सुळे, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, राजीव झा, नरेंद्र वर्मा, राजेंद्र जैन, सच्चिदानंद सिंग, ब्रिजमोहन श्रीवास्तव, के. जे. जोसेमन, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दुहान, शब्बीर विद्रोही, पुष्पेंद्र मलिक, सीमा मलिक, विरेंद्र सिंग, गोविंदभाई परमार, वेदपाल चौधरी, उमाशंकर यादव, एस. पी. शर्मा, मुरलीमनोहर पांडे, नवलकिशोर साही, राहत काद्री, जितेंद्र पासवान, ललिता सिंग, संजय केशरी, इस्तियाक आलम, अकबर अली, मनोज जैस्वाल, खुशारो आफ्रीदी, ब्रिजबिहारी मिश्रा, शकील अहमद, अझर आलम, इंदू सिंग, चांदबाबू रहेमान, चंद्रेश कुमार, चंद्रशेखर सिंग आदींचा समावेश आहे.
शिवसेनेसाठी उद्धव ठाकरे प्रचारसभा घेणार
शिवसेनेनंही आपल्या २० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचाही त्यात समावेश आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर होणारी ही निवडणूक शिवसेना ताकदीनं लढवणार असून पक्षाकडून एकूण ५० उमेदवार रिंगणात उतरवले जाणार आहेत.
आणखी वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times