अहमदनगर: नगर शिवसेनेत उफाळून आलेल्या वादावर पडदा टाकण्यात अखेर वरिष्ठ पातळीवर यश आल्याची चिन्हे दिसू लागले आहेत. आज शिवसेनेच्या सर्वच नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांचे मनोमिलन करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्यात आले व त्यामध्ये यशही येताना दिसत आहे.

महापालिकेतील स्थायी समिती सभापती तसेच स्वीकृत नगरसेवक निवडीवरून नगरच्या शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली होती. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू होते. मात्र हे गटातटाचे राजकारण मिटावे, यासाठी आज नगरमध्ये दोन्ही गटांतील नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीला संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर , जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, युवासेनेचे विक्रम राठोड, महिला आघाडीच्या आशा निंबाळकर, ज्येष्ठ शिवसैनिक अंबादास पंधाडे यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर इथून पुढे शिवसेनेत कुठल्याही प्रकारची दुफळी राहणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले.

वाचा:

या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘दुफळी संघटनेत नव्हती तर वैयक्तिक हेवेदावे प्रत्येकाचे एकमेकांना कारणीभूत होते. त्याच्यावर पडदा टाकण्यासाठी मी, जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, विक्रम राठोड या सर्वांनी आजची बैठक घेतली. विक्रम राठोड यांनी प्रत्येक नगरसेवकासोबत संवाद साधला होता. तसेच आजच्या बैठकीत एकमेकांबद्दल जे क्लेश होते, ते दूर झाले आहेत. आता सर्वच लोक एकत्र दिसतील. आपण आपापसात भांडतोय, हे सर्वांना भासले आहे. त्यामुळे येथून पुढे तसे काही दिसणार नाही. तर विक्रम राठोड यांनी सांगितले, ‘नगर शहर शिवसेनेत दुफळी निर्माण झाली होती ती मिटवण्यासाठी व दोन्ही गटाचे मनोमिलन व्हावे, यासाठी आजचा कार्यक्रम घेण्यात आला. याला सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांना बोलावले होते.’

वाचा:

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here