मुंबई: मुंबई पोलिसांनी खूप मोठा चव्हाट्यावर आणला आहे. यात दोन मराठी चॅनेल आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या ” या वृत्तवाहिनीचाही सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती दिली. ( commissioner On TRP Racket )

मुंबई पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं आहे. टीआरपी एजन्सीच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे रॅकेट चालवले जात होते. यात पैसे देऊन रेटिंग वाढवण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’च्या चालकांना अटक करण्यात आली आहे. ८ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. ‘रिपब्लिक टीव्ही ‘ या हिंदी व इंग्रजी चॅनेलचा चालकही या रॅकेटमध्ये असल्याचा संशय आहे. रिपब्लिकने पैसे देऊन टीआरपी रेटिंग वाढवल्याचे पुरावे हाती लागत आहेत. विशिष्ट चॅनेल घरात लावण्यासाठी पैसे दिले गेल्याचेही तपासात आढळले आहे, असे परमबीर सिंग यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here