लुईस ग्लूक या येल विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापक आहेत. ७७ वर्षांच्या लुईस ग्लूक यांना याआधीदेखील अमेरिकेत साहित्यासाठी विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लुईस यांना १९९३ मध्ये साहित्य विभागात पुलित्झर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. मागील वर्षी २०१९ मध्ये ऑस्ट्रियाचे वंशाचे लेखक पीटर हँडका यांनी देण्यात आला होता. नाविन्यपूर्ण लेखन आमि भाषेतील नवीन प्रयोगाची दखल घेत त्यांना हा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला.
वाचा:
दोनदा स्थगित झाला आहे साहित्यातील नोबेल
१९०१मध्ये सुरू झालेल्या नोबेल पुरस्काराच्या ११९ वर्षाच्या इतिहासात दोन वेळेस साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार स्थगित करण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान १९४३ मध्ये पहिल्यांदा पुरस्काराला स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर २०१८ मध्ये स्वीडीश अॅकेडमीच्या परीक्षक मंडळाचे सदस्य कॅटरीना यांचे पती आणि फ्रान्सचे छायाचित्रकार जेन क्लोड अरनॉल्ट यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते. त्यावेळी हा पुरस्कार स्थगित करण्यात आला होता.
वाचा:
वाचा: नोबेल पुरस्काराचा इतिहास
नोबेल पुरस्कार जगभरात प्रतिष्ठेचा समजला जातो. हा पुरस्कार नोबेल फाऊंडेशनकडून दिला जातो. डायनामाइटचा शोध लावणारे स्वीडनचे शास्त्रज्ञ अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिले जातात. दरवर्षी त्यांच्या स्मृतीदिनी, १० डिसेंबर रोजी पुरस्कार प्रदान सोहळा होतो. वैद्यकशास्त्रासह भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, शांती आणि अर्थशास्त्र या क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times