मुंबई: ”मधील या व्यक्तिरेखेनं लाखो प्रेक्षकांना वेड लावलं होतं. तिच्या अदांवर महाराष्ट्रातला प्रेक्षकवर्ग भाळला होता. मालिका संपल्यापासून प्रेक्षकांना शेवंताची आठवण येत आहे. शेवंताच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. अभिनेत्री पुन्हा एकदा तिच्या खास अदांसह टेलिव्हीजनवर पुनरागमन करणार आहे.

” या आगामी मालिकेमध्ये ती झळकणार असून, या मालिकेत अपूर्वा ‘पम्मी’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या विनोदी मालिकेला ग्लॅमरचा तडका देण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येतेय.

ग्लॅमर कसं घ्यावं हे मला माहीत नाही. पण, अतिग्लॅमरमुळे एक वेळ अशी येते की तुम्ही अभिनय विसरू लागता. मग तुम्ही फक्त ग्लॅमरकडेच ओढले जाता. मला ते नाही करायचं. बऱ्याचश्या अभिनेत्रींबाबत मला प्रश्न पडतो, त्या डान्सर आहेत का अभिनेत्री आहेत? अलीकडेच एका पुरस्कार सोहळ्यात मी नृत्य परफॉर्मन्स केला. त्यानंतर नृत्यासाठी मला अनेक ठिकाणांहून ऑफर्स आल्या. पण, मला कुठेही नाचायचं नाहीय. मी स्वतःकडे प्रथम अभिनेत्री म्हणून पाहते. त्याबरोबर ग्लॅमर येत असेल, तर ते स्वीकारेन. पण, लोकांनी मला ग्लॅमरसाठी नव्हे, तर माझ्या भूमिकेमुळे ओळखलं पाहिजे, असं अपूर्वा म्हणतेय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here