‘पंतप्रधानांनी आपल्यासाठी ८,४०० कोटी रुपयांचे विमान खरेदी केले’
राहुल गांधी यांनी सियाचीन आणि लडाख येथे तैनात असलेल्या भारतीय सैनिकांसाठी गरम कपडे आणि आवश्यक ते सामान खरेदी करण्याशी संबंधित एका बातमीचा स्क्रिनशॉट शेयर करत पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, ‘पंतप्रधानांनी स्वत:साठी ८,४०० कोटी रुपयांचे विमान खरेदी केले. एवढ्या रकमेमध्ये सियाचीन आणि लडाख सीमेवर तैनात असलेल्या आमच्या जवानांसाठी कितीतरी आवश्यक गोष्टी खरेदी केल्या जाऊ शकत होत्या- गरम कपडे: ३०,००,०००, जॅकेट, हातमोजे: ६०,००,०००, बूट: ६७,२०,०००, ऑक्सिजन सिलेंडर: १६,८०,०००. पंतप्रधानांना केवळ आपल्या प्रतिमेची चिंता आहे, सैनिकांची नाही.’
क्लिक करा आणि वाचा-
मंगळवारी देखील राहुल गांधींने केला होता हल्लाबोल
या पूर्वी राहुल गांधी यांनी मंगळवारी देखील या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला होता. एकीकडे पंतप्रधान मोदी यांनी ८ हजार कोटी रुपये खर्चून १ विशेष विमाने खरेदी केली आहेत. तर दुसरीकडे आमच्या सीमांवर चीन उभा आहे आणि आमचे सैनिक सीमांवर आमच्या संरक्षणासाठी भीषण थंडीचा सामना करत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले होते.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times