वाचा:
जळगाव महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आहे. पालिकेतील ७५ पैकी एकूण ५७ नगरसेवक भाजपाचे आहेत. असे असताना देखील सुरुवातीपासूनच भाजप नगरसेवकांमध्ये अनेकवेळा गटबाजी उफाळून आली आहे. आज गुरुवारी महापालिकेत प्रभाग समिती सभापतीपदासाठी निवड प्रकिया पार पडली. ही प्रकीया आटोपल्यानतंर काही नगरसेवक व नगरसेविका हे स्थायी सभापती यांच्या दालनात बसलेले असतानाच भाजप नगरेविका ज्योती चव्हाण यांचे पती तथा महापालिकेतील कर्मचारी बाळासाहेब चव्हाण व भाजपाचे महानगर कार्यकारणीचे पदाधिकारी भूपेश कुळकर्णी यांच्यात महापौर दालनातच जोरदार बाचाबाची झाल्याने महापालिका इमारतीमध्ये जोरदार खळबळ उडाली.
वाचा:
पैशावरून चव्हाणांनी शिविगाळ केली: कुळकर्णी
याबाबत भाजपाचे पदाधिकारी भूपेश कुळकर्णी यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले की, महापालिकेत महापौर यांच्या दालनाबाहेर आपण थांबलेलो असतानाच नगरसेविका ज्योती चव्हाण यांचे पती व मनपा कर्मचारी बाळासाहेब चव्हाण जवळ आले. त्यांनी तू माझ्या वार्डात काम करतो, त्या कामाचा हिशोब करून पैसे दिले नाही, म्हणून वाद घातला. मी त्यांना पैशांचा विषय बोलण्याची ही जागा नसल्याने सांगितले. तरी देखील त्यांनी मला शिवीगाळ केल्याने वाद झाला. त्यानंतर महापौरांच्या दालनात देखील त्यांनी पैशाची मागणी करीत शिवीगाळ सुरूच ठेवली. तसेच दालनातील खुर्ची माझ्यावर उगारून ते अंगावर धावून आले. त्यावेळी महापौरांच्या दालनातील अधिकाऱ्यांनी त्यांना व मला शांत केले. माझी चूक नसताना चव्हाण यांनी शिवीगाळ करीत वाद घातल्याचा आरोप कुळकर्णी यांनी केला.
वाचा:
काहीच झाले नाही, मला काही बोलायचे नाही: चव्हाण
याबाबत नगरसेविका ज्योती चव्हाण यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी माझा कुणाशीच वाद झाला नसल्याचा दावा केला. तसेच मला काहीच बोलायचे नाही, असे देखील ‘मटा’शी बोलतांना सांगितले.
दालनात घटना घडल्याची माहिती: महापौर
यावर महापौर यांनी सांगितले की, हा प्रकार घडला त्यावेळी मी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासोबत महापालिकेच्या कोविड सेंटरची पाहणी व रुग्णांच्या भेटी घेण्यासाठी गेले होते. त्यामुळे नेमके दालनात काय झाले ते माहिती नाही. माहिती घेवूनच यावर बोलता येईल, असेही त्या म्हणाल्या.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times