न्यायमूर्ती यांच्या खंडपीठासमोर आज रियाच्या अर्जावर सुनावणी झाली. हमीदारांची त्वरित व्यवस्था होऊ शकणार नसल्याने सध्या रोखीच्या जामिनावर सुटका होण्याची मुभा द्यावी, अशी विनंती रियाचे वकील अॅड. यांनी केली. गेल्या महिनाभरापासून रिया तुरुंगात होती. यादरम्यान तुरुंगात तिनं या परिस्थितीला कसं तोंड दिलं याबद्दल मानेशिंदे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
येणारा प्रत्येक दिवस रियासाठी अवघड असाच होता. यादिवसांमध्ये तिनं स्वत:ला सकारात्मक ठेवण्यासाठी योगाची मदत घेतली. तिनं तुरुंगातील इतर कैद्यांना देखील योगा शिकवला. मीडियानं देखील तिचा प्रचंड पाठलाग केला होता. तिच्या प्रत्येक गोष्टींवर लक्ष ठेवलं जात होतो. त्यामुळं ती कोणत्या अवस्थेत तिथं राहतेय हे पाहण्यासाठी गेलो होतो. करोनामुळं घरचं जेवण तिला मिळत नव्हतं, त्यामुळं तुरुंगातील इतर कैद्यांप्रमाणेच ती तिथं राहत होती. यापुढं तिच्यावर आरोप करणाऱ्या आणि तिला संकटात ओढणाऱ्या प्रत्येकाशी लढण्यासाठी ती तयार आहे, असं म्हणता मानेशिंदे यांनी रियाचा उल्लेख बंगालची वाघीण असा केला.
दरम्यान, काल जामीन मिळाल्यानंतरही मानेशिंदे यांनी कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. मानेशिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला होता. ‘न्यायालयाच्या या निर्णयाने आम्ही खूप आनंदित आहोत. रियाची अटक आणि कोठडी ही अन्यायकारकच होती. न्यायालयाने वस्तुस्थिती आणि कायदेशीर मुद्दे लक्षात घेऊनच रियाला जामीन मंजूर केला आहे. सीबीआय, ईडी आणि एनसीबी अशा तीन-तीन तपास यंत्रणांनी रियाला लक्ष्य केले असून ते आता थांबायला हवे,’ असं ते म्हणाले. ‘आम्ही नेहमी सत्याच्याच बाजूने राहणार आहोत,’ असंही ते म्हणाले होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times