संबंधित बातम्या :
वाचा :
वाचा :
गेल्याच महिन्यात ११ सप्टेंबर रोजी रामविलाास पासवान यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. यावेळी, बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या अनुपस्थितीत आपला मुलगा चिराग पासवान याच्याकडे पक्षाची सूत्रं सोपवल्याचं पासवान यांनी सोशल मीडियावरून जाहीर केलं होतं. ‘पक्षासंबंधी निर्णय घेण्याचे सर्व अधिकार तसंच एखाद्या पक्षासोबत जाण्याचा किंवा न जाण्यासंबंधी चिराग पासवान जे निर्णय घेतील, ते अंतिम निर्णय असतील’, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं. या अगोदर, ऑगस्ट महिन्यातही फुफ्फुस आणि मूत्रपिंडाचा त्रास झाल्यानंतर पासवान यांना दिल्लीतील फोर्टिस एस्कॉर्ट रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यांना आधीपासून हृदयविकाराचा त्रास होता.
राजकीय कारकीर्द
रामविलास पासवान हे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. याशिवाय ते बिहारच्या लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्षही होते. लोकसभेत त्यांनी बिहारच्या हाजीपूर लोकसभा मतदार संघाचं प्रतिनिधित्व केलं. रामविलास पासवान ३२ वर्षात ११ वेळा निवडणुका लढले. यापैंकी ९ निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला. तसंच पासवान यांनी सहा पंतप्रधानांसोबत काम केलं. रहा एक वेगळा विक्रम त्यांच्या नावावर आहे.
रामविलास पासवान हे मूळचे बिहारमधील खगेरिया जिल्ह्यातील शराबान्नी गावचे रहिवासी होते. १९६० मध्ये राजकुमारी देवी यांच्याशी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना उषा आणि आशा या दोन मुली आहेत. मात्र १९८१ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला होता. यानंतर त्यांनी १९८३ मध्ये रीना शर्मा यांच्याशी लग्न केले. रीना – रामविलास पासवान या दाम्पत्याला एक मुलगी आणि मुलगा चिराग पासवान ही दोन मुले आहेत.
इतर बातम्या :
वाचा :
वाचा :
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times