जळगाव: पक्षांतर्गत अन्याय झाल्यामुळे नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच खडसे यांनी आज मुंबईत झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीला प्रत्यक्षात पक्ष कार्यालयात न जाता व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजेरी लावली. दरम्यान, काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या विषयावर तसं काही नसल्याचे खडसे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. तसे काही असल्यास मी स्वत:च सांगेन, असेही ते म्हणाले. ( Leader ‘s Latest News Updates )

वाचा:

गेल्या काही दिवसांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज असलेले जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. काल बुधवारपासून एकनाथ खडसे हे मुबंईत ठाण मांडून असल्याने त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेने अधिक जोर धरला आहे. मुंबईत खडसे राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांची भेट घेणार असल्याची दाट शक्यता देखील वर्तविली जात आहे. मात्र, एकनाथ खडसे यांनी हस्पिटलच्या कामासाठी मुंबईत आल्याचे सांगत शरद पवार यांची भेट घेण्याचा वृत्ताचा स्पष्ट शब्दात इन्कार केला होता. दुसरीकडे शरद पवार यांनीही अशी कोणतीही भेट ठरलेली नसल्याचे सांगितले.

वाचा:

दरम्यान, आज मुंबईत भाजपाच्या नवनियुक्त राज्य कार्यकारणीची बैठक होती. त्याला खडसे उपस्थित राहणार का, याची सर्वांना उत्सुकता होती. खडसे पक्ष कार्यालयात प्रत्यक्षात उपस्थित राहिले नाहीत. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी बैठकीला उपस्थिती लावली. या बैठकीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरिश महाजन यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. जळगावातून देखील जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांनी ऑनलाइन पद्धतीने बैठकीस हजेरी लावली.

वाचा:

राष्ट्रवादीत प्रवेशाची चर्चा कायम

एकीकडे खडसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाजप राज्य कार्यकारणीच्या बैठकीत उपस्थित लावली असली तरी जळगाव जिल्ह्यात मात्र त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाची चर्चा कायम आहे. येत्या चार दिवसांत खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे संकेत आहेत. राष्ट्रवादीकडून खडसे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचेही खडसे यांचे जळगावातील समर्थक छातीठोकपणे सांगत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here