रशियाचे पंतप्रधान दिमित्री यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह त्यांनी राजीनामा दिला. रशियाच्या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर यांनी मेदवेदेव यांचे आभार मानले. पण पंतप्रधान आपली उद्दिष्ट्ये गाठण्यात अपयशी ठरले, अशी प्रतिक्रिया पुतीन यांनी व्यक्त केली. दुसरीकडे, असंही म्हटलं जात आहे की राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यामार्फत घटना बदलण्याचा प्रस्ताव असल्याने सध्याच्या सरकारने राजीनामा दिला.
मेदवेदेव यांना सुरक्षा परिषदेचं अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. ते २०१२ पासून रशियाचे पंतप्रधान आहेत आणि राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या जवळ होते. ते २००८ ते २०१२ या कालावधीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष होते. पुतीन यांनी नवं मंत्रिमंडळ स्थापन होईपर्यंत कार्यरत राहा, असं पुतीन यांनी मेदवेदेव कॅबिनेटला सांगितलं आहे.
बुधवारी पुतीन यांनी देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मेदवेदेव यांनी राजीनामा दिला. आपल्या भाषणादरम्यान पुतीन यांनी संविधानातील दुरुस्तीचा प्रस्ताव ठेवला. यात कॅबिनेटची शक्ती वाढवण्याचाही प्रस्ताव आहे.
असं म्हटलं जात आहे की पुतीन यांनी स्वत:ला सत्तेत राहण्यासाठी हा प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे ते पंतप्रधान जरी झाले तरी दीर्घकाळ सत्तेच्या चाव्या त्यांच्या हाती राहतील. २०२४ मध्ये त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आहे. हा त्यांचा चौथा कार्यकाळ आहे. पुतीन यांनी आपल्या भाषणात म्हटलं की भविष्यात राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ दोन टर्मपर्यंतच मर्यादित केला जायला हवा.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times