दुबई: दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर (Kings XI Punjab) विरुद्धच्या सामन्यात (Sunrisers Hyderabad) संघाने २० षटकात ६ बाद २०१ धावा केल्या. हैदराबादने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादची सलामीची जोडी कर्णधार ( ) आणि () यांनी पहिल्या विकेटसाठी १६० धावांची भागिदारी केली.

वाचा-
वॉर्नरने ४० चेंडूत ५ चौकार आणि १ षटकारांसह ५२ धावा तर बेयरस्टोने ५५ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह ९७ धावा केल्या. हे दोघे पहिल्या ओव्हरपासून पंजाबच्या गोलंदाजांवर तुटून पडले.

वाचा-
या सामन्यात बेयरस्टो आणि वॉर्नर जोडीने सलामीला येत १ हजार धावा पूर्ण केल्या. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारी ही ७वी जोडी आहे. सलामीला येत सर्वाधिक धावा करण्याचा करण्याचा विक्रम ज्या जोडीच्या नावावर आहे त्यात वॉर्नरचा समावेश आहे. वॉर्नर आणि शिखर धवनने ४७.२३ च्या सरासरीने २ हजार २२० धावा केल्या आहेत.

वाचा-

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या सलामीचे फलंदाज

१) डेव्हिड वॉर्नर- शिखर धवन २ हजार २२० धावा
२) गौतम गंभीर-रॉबिन उथप्पा १ हजार ४७८ धावा
३) ब्रॅडन मॅकलम- ड्वेन स्मिथ १ हजार ३६३ धावा
४) मायकल हसी-मुरली विजय १ हजार ३६० धावा
५) ख्रिस गेल-विराट कोहली १ हजार २१० धावा
६) ख्रिस गेल- केएल राहुल- १ हजार ०७३ धावा
७) डेव्हिड वॉर्नर- बेयरस्टो १ हजार धावा

वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here